पाठलाग – (भाग- ६)

(23)
  • 8.2k
  • 2
  • 4.3k

सेकंदामागुन सेकंद, मिनीटा मागुन मिनीट जात होती पण युसुफचा काहीच पत्ता नव्हता. दिपकची चलबिचल वाढत चालली होती. इतकं अस्वस्थ, इतकं हतबल त्याला यापुर्वी कधीच वाटले नव्हते. पिंजर्‍यात ठेवलेल्या एखाद्या हिंस्त्रपशुसारखा तो इकडुन तिकडे येरझार्‍या घालत होता. इतक्यात त्याला बाहेर हालचाल जाणवली. दिपक सावध झाला. हळुवारपणे त्याच्या कोठडीच्या कुलुपात एक किल्ली सरकवली गेली होती आणि अत्यंत सावकाशपणे ती किल्ली फिरवुन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न होत होता. थोडावेळ खुटपुट झाल्यावर एकदाचे ते दार उघडले गेले. दारामध्ये युसुफ उभा होता. युसुफला बघताच दिपकचा जिव भांड्यात पडला. “चल लवकर..”, युसुफ म्हणाला.. क्षणाचाही विलंब न करता दिपक बाहेर पडला. व्हरांड्यात युसुफच्या मागे अजुन एक कैदी उभा