Pathlag by Aniket Samudra | Read Marathi Best Novels and Download PDF Home Novels Marathi Novels पाठलाग - Novels Novels पाठलाग - Novels by Aniket Samudra in Marathi Novel Episodes (601) 72.2k 67.4k 79 जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट वातावरणात उष्णता अधीकच जाणवत होती. चर्चगेट स्टेशनमधुन बाहेर आल्या-आल्या मुंबईचा तो टिपीकल फिल दिपकच्या अंगावर ...Read Moreरस्ता भरुन वाहणारी वाहनांची गर्दी, स्टेशनच्या आतबाहेर करणारे माणसांचे लोंढे, फेरीवाले, पदपथावरील छोटेमोठे स्टॉल्स, भिकारी.. सगळं अगदी जस्सच्या तस्स होतं. त्यात काहीच फरक पडला नव्हता. दिपक.. अर्थात लेफ्टनन दिपक कपुर.. तीन वर्षांपासुन काश्मीरच्या खोर्यात तैनात होता. गेल्याच वर्षी तो सुट्टीवरुन परतला होता. पण आता… आता त्याला मुंबईला सुट्टी काढुन लगेच परतणे अत्यंत गरजेचे होते नाहीतर जेनीने आणि तिच्या पोटात वाढणार्या Read Full Story Listen Download on Mobile Full Novel पाठलाग – (भाग-१) (35) 8.7k 8.2k जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट वातावरणात उष्णता अधीकच जाणवत होती. चर्चगेट स्टेशनमधुन बाहेर आल्या-आल्या मुंबईचा तो टिपीकल फिल दिपकच्या अंगावर ...Read Moreरस्ता भरुन वाहणारी वाहनांची गर्दी, स्टेशनच्या आतबाहेर करणारे माणसांचे लोंढे, फेरीवाले, पदपथावरील छोटेमोठे स्टॉल्स, भिकारी.. सगळं अगदी जस्सच्या तस्स होतं. त्यात काहीच फरक पडला नव्हता. दिपक.. अर्थात लेफ्टनन दिपक कपुर.. तीन वर्षांपासुन काश्मीरच्या खोर्यात तैनात होता. गेल्याच वर्षी तो सुट्टीवरुन परतला होता. पण आता… आता त्याला मुंबईला सुट्टी काढुन लगेच परतणे अत्यंत गरजेचे होते नाहीतर जेनीने आणि तिच्या पोटात वाढणार्या Listen Read पाठलाग – (भाग-२) (23) 4.4k 4.2k “ऑर्डर ऑर्डर…!!” न्यायमुर्तींनी टेबलावर आपला लाकडी हाथोडा आपटला आणि पुन्हा एकवार न्यायालयात शांतता पसरली. न्यायालयात केस उभी राहिल्यापासून असलेल्या गर्दीने आज उच्चांक गाठला होता. खर तर निकाल काय लागणार आहे हे स्पष्टच होते, पण तरीही निकाल ऐकायला लोकांनी गर्दी ...Read Moreहोती. “पब्लीक प्रॉस्येक्युटर.. यु मे कंन्टीन्यु…”… आणि केसच्या शेवटच्या दिवसाचे न्यायालयीन कामकाज सुरु झाले. आरोपीच्या पिंजर्यात उभ्या असलेल्या दिपकचे मन मात्र अजुनही भूतकाळातच घुटमळत होते.———————————————————————————————— “जेनी.. वेक अप जेनी… कमऑन जेनी..डोन्ट गिव्ह अप ऑन मी..”, निस्तेज पडलेल्या जेनीला हलवत दिपक जिवाच्या आकांताने ओरडत होता. पोलिसांच्या दोन जिप सायरन वाजवत घटनास्थळी येऊन थबकल्या. मुंग्याच्या वारुळातुन जश्या मुंग्या बाहेर पडतात तसे पटापट Listen Read पाठलाग – (भाग-३) (29) 3.9k 4.3k दिपकला झोप लागली असली तरी त्याच्या संवेदना जागृत होत्या. सैनिकी प्रशिक्षणाचा परीणाम म्हणा किंवा त्याचा सिक्स्थ सेन्स म्हणा परंतु दिपकला अचानक जाग आली. आपल्याला अशी अचानक जाग का आली असावी ह्याचा विचार करत तो जागेवरच पडुन आजुबाजुला घडणार्या घटनांचा ...Read Moreघेउ लागला. काही क्षण शांततेत गेल्यावर त्याला लॉकअपच्या बाहेर हलकीशी हालचाल जाणवली. किमान ३-४ व्यक्ती हलक्या आवाजात एकमेकांशी कुजबुजत होत्या. दिपक कानोसा घेत पडुन राहीला. थोडा वेळ शांततेत गेल्यावर त्याच्या लॉकअपचे दार हळुच उघडले गेल आणि बाहेर थांबलेल्या त्या व्यक्ती आतमध्ये आल्या. दिपक अजुनही स्तब्ध पडुन होता. हळु हळु त्या व्यक्ती दिपकच्या भोवती जमा झाल्या. त्यांच्यातील एक व्यक्ती दिपकच्या अगदी Listen Read पाठलाग – (भाग- ४) (19) 3.5k 3.9k दिपक आपल्या कोठडीत परतला खरा, पण तो विचार त्याच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हता.काय आहे ६ दिवसांनी? कोण आहे तो कैदी? तो आपल्याला का मदत करत आहे? ह्यात काही काळ-बेर तर नसेल ना? कश्यावरून हा पोलिसांचाच एखादा डाव नसेल? ...Read Moreमला इथून पळून जायला भाग पाडतील आणि मग पळून जात होता म्हणून जाताना गोळ्या घालतील? चार दिवसांच्या ओळखीवर ह्या कैद्यावर भरवसा ठेवावा का? अनेक प्रश्न दिपकच्या डोक्यात जमा झाले होते. पण त्यामुळे निदान त्याला काही काळापुरता का होईना जुन्या दुःखद गोष्टींचा विसर पडला होता. सुस्त झालेला त्याचा मेंदु विचार करु लागला होता आणि नकळतच ‘ह्या कैद्याच्या साथीने इथुन पळुन जाता Listen Read पाठलाग – (भाग- ५) (20) 3k 3.3k “ठिक आहे तर, मी सांगतो तसं कर. थोड्यावेळाने मला मारायला सुरुवात कर. इतकं मार की रक्त निघालं पाहीजे. अर्थात तुलाही थोडा मार खावा लागेलच, पण..” “अरे पण का? कश्यासाठी”, दिपक मध्येच म्हणाला.“सांगतोय.. ऐक आधी.. ते एवढ्यासाठी की एकदा का ...Read Moreकोठडीत गेलो की परत बाहेर येणं शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्यापैकी कुणालातरी कोठडीच्या बाहेर रहाणे आवश्यक आहे. तुरुंगाची मला जास्ती माहीती आहे त्यामुळे मी बाहेर राहीलो तर तुमची सुटका करु शकेन. आपल्या मारामारीत मी जखमी झाल्यावर मला येथीलच एका छोट्या दवाखान्यात भरती करतील मलम-पट्टीसाठी. तेथुन बाहेर पडणे ह्या कोठडीपेक्षा नक्कीच सोपे आहे. तेथुन बाहेर पडलो की इथल्या चाव्या मी मिळवेन.. Listen Read पाठलाग – (भाग- ६) (20) 2.5k 2.5k सेकंदामागुन सेकंद, मिनीटा मागुन मिनीट जात होती पण युसुफचा काहीच पत्ता नव्हता. दिपकची चलबिचल वाढत चालली होती. इतकं अस्वस्थ, इतकं हतबल त्याला यापुर्वी कधीच वाटले नव्हते. पिंजर्यात ठेवलेल्या एखाद्या हिंस्त्रपशुसारखा तो इकडुन तिकडे येरझार्या घालत होता. इतक्यात त्याला बाहेर ...Read Moreजाणवली. दिपक सावध झाला. हळुवारपणे त्याच्या कोठडीच्या कुलुपात एक किल्ली सरकवली गेली होती आणि अत्यंत सावकाशपणे ती किल्ली फिरवुन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न होत होता. थोडावेळ खुटपुट झाल्यावर एकदाचे ते दार उघडले गेले. दारामध्ये युसुफ उभा होता. युसुफला बघताच दिपकचा जिव भांड्यात पडला. “चल लवकर..”, युसुफ म्हणाला.. क्षणाचाही विलंब न करता दिपक बाहेर पडला. व्हरांड्यात युसुफच्या मागे अजुन एक कैदी उभा Listen Read पाठलाग – (भाग- ७) (22) 2.5k 2.6k “गुड बाय धोंड्या…” दिपक स्वतःशीच पुटपुटला. मनगटावर जोर देऊन त्याने खांदा वर उचलला आणि बंदुकीची नळी बरोब्बर सेट केली. तो कुठल्याही क्षणी ट्रीगर दाबणार इतक्यात त्याच्या काहीतरी लक्षात आले. तो परत सावकाश पहील्यासारखा गवतात खाली झोपला. त्याने बंदुक आपल्या ...Read Moreआणली आणि हलकेच हलवली. आतुन बारीक किण-किण आवाज आला. इस्माईल खाली कोसळला तेंव्हा त्याची बंदुक शेजारच्या खडकावर पडली होती आणि त्यामुळे बंदुकीच्या आतील स्प्रिंग लुज झाली होती. दिपकने सैन्यात असताना अश्या कित्तेक बंदुका हाताळल्या होत्या आणि असे अनेक बारीक-सारीक प्रॉब्लेम त्याला माहीत झाले होते. आत्ता जर त्याने ट्रीगर दाबले असते तर गोळी सुटली नक्की असती, पण तिने अपेक्षीत वेध नक्कीच Listen Read पाठलाग – (भाग- ८) (19) 2.3k 2.1k त्या गजबजलेल्या वस्तीतील एका मोडक्या मेंन्शन मध्ये जमलेल्या त्या तिघा-चौघांच्या नजरा दरवाज्याकडे वळल्या जेंव्हा दरवाज्यातुन एक चिकना तरुण आतमध्ये आला. त्याच्या चालण्यात एक विलक्षण आत्मविश्वास होता. आरमानी जिन्स आणि स्पायकर जिन्सचा अर्धा खोचलेला निळा जिन्सचा शर्ट त्याने घातला होता. ...Read Moreएक स्टीलचे ब्रेसलेट होते, शर्टची वरची दोन बटणं उघडी होती आणि त्यातुन यु.एस.ए चे मराईन्स सोल्जर घालतात तसले एक लॉकेट डोकावत होते. डोळ्यावर गडद रंगाचा गॉगल होता. जॉनी आतमध्ये आला तसे सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. आणि अर्थात त्याचे इथे येणे अपेक्षीतच होते. बॉसच्या मर्जीतला आणि शार्प शुटर जॉनीला बोलावणं धाडण्यात आलं होतं. बॉसचा भाऊ, इस्माईल मारला गेला होता.. माफीया डॉनचा Listen Read पाठलाग – (भाग- ९) (20) 2.4k 2.1k दिपकने खिडकीतुन डोकावुन बाहेर पाहीले. समुद्रकिनारी शेकोटी पेटलेली दिसत होती. शेकोटी भोवती काही तरुण-तरुणी फेर धरुन नाचत होत्या. ठेका धरायला लावणार्या संगीताचे स्वर ऐकु येत होते. दिपकने हॉटेलच्या अंतरंगातुन नजर फिरवली. अगदी चकाचक नसले तरी अगदीच शॅबी पण नव्हते. ...Read Moreआसनं आरामदायक होती, दिव्यांची मांडणी आल्हाददायक होती, वॉलपेपर, टेक्श्चर पेंट, मॉडर्न आर्ट पेन्टींग्स वापरुन भिंती सजवलेल्या होत्या. कुठेही भडकपणा नव्हता, कुठेही दिखाऊ-वृत्ती नव्हती. एकुण वातावरण उत्साहवर्धक होते. थकुन आलेल्या कुठल्याही प्रवाश्याला इथेच रहावे असे वाटेल असेच सर्व काही होते. दिपकची नजर फिरत फिरत लॉबीच्या समुद्राच्या बाजुला उघडणार्या दरवाज्याकडे गेली. तेथे साधारण एक तिशीतली तरुणी कमरेवर हात ठेवुन उभी होती. काळपट-लाल Listen Read पाठलाग – (भाग-१०) (15) 2.2k 1.9k दुसर्या दिवसाची सकाळ प्रसन्न होती. दिपक अगदी गाढ झोपला होता, जणु कित्तेक दिवसांची झोप तो पुर्ण करत होता. खिडकीतुन उबदार सुर्याची किरण अंगावर आली आणि खार्या वार्याचा एक झोक नाकात शिरला तसा दिपक जागा झाला. त्याला पहील्यासारखेच फ्रेश वाटत ...Read Moreतो खोलीचे दार उघडुन बाहेर आला. हॉटेलमधील वेटर्सची नेहमीप्रमाणे लगबग चालु होती. केसांवरुन हात फिरवत तो व्हरांड्यात आला तोच थॉमसही तेथे आला. उघडाबंब आणि लाल रंगाची बर्म्युडा घातलेला थॉमस अजुनच अवाढव्य भासत होता. “गुड मॉर्नींग दिपक, कशी झाली झोप?”, त्याने दिपकला विचारले.“मस्त.. खुप मस्त. हवेत गारठा असुनही समुद्राच्या दमटपणामुळे मस्त उबदार वाटत होते. खुपच वेळ झोपलो खरं तर..”, खजील होत Listen Read पाठलाग – (भाग-११) (14) 2.4k 2.4k थॉमस शिवाय खरं तर दीपककडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. हॉटेल मधील स्टाफशी अस अचानक स्टेफनी बद्दल बोलणे योग्य ठरले नसते. शिवाय उगाच तिला संशय आला असता तर सगळेच काम बिघडले असते. थॉमसशी संबंध चांगले करायचे आणि हळू हळू बोलता ...Read Moreथोडी थोडी माहित काढत जायची असा ढोबळ प्लान त्याने आखला होता. रात्री थॉमस आल्यावर तिघेही नेहमीप्रमाणे खुर्च्या टाकून समुद्र किनारी बसले. थॉमसने येताना चीवाज-रिगलचे ३-४ बॉक्स हॉटेल मधील संपत आलेला स्टोक भरायला आणले होते, त्यातील २ बाटल्या घेऊन तो बसला होता. गप्पांचा नेहमीचाच विषय चालला होता इतक्यात दीपकला एक कल्पना सुचली. अचानक गंभीर होत तो म्हणाला..”थॉमस, मला तुला माझ्याबद्दल काही Listen Read पाठलाग – (भाग-१२) (17) 2.2k 1.8k “काय??? थॉमसचा खुन???.. मी कश्याला करु थॉमसचा खुन??”, दिपक पुन्हा ओरडत म्हणाला.. स्टेफनीने त्याच्या तोंडावर हात ठेवला.. “हळु बोल म्हणलेले कळत नाहीये का तुला?..” स्टेफनीने इकडे तिकडे पाहीले. बाहेर अजुन सामसुमच होती. “चल माझ्या बरोबर..”, दिपकचा हात ओढत ती ...Read Moreम्हणाली. दिपक बधीरावस्थेत तिच्यामागोमाग थॉमसच्या रुम मध्ये गेला. स्टेफनीने पुन्हा एकवार कोणी नाहीये याची खात्री करुन घेतली आणि दिपकला घेउन ती खोलीत गेली.खोलीत मिट्ट काळोख होता. स्टेफनीने दार लावुन घेतले आणि मग खोलीतला दिवा लावला. थॉमसचा उघडाबंब अवाढव्य देह त्याच्या बेडवर अस्ताव्यस्त पडला होता. त्याच्या छातीमध्ये पार आतपर्यंत खुपसलेला एक भला मोठ्ठा सुरा तसाच रुतलेला होता. भुत बघीतल्यासारखा दिपक त्या Listen Read पाठलाग – (भाग-१३) (17) 2.3k 1.9k युसुफला समोर बघुन दिपकला आश्चर्याचा धक्काच बसला होता. खुप दिवसांनी एखादा जुना मित्र भेटावा तसं दिपकने युसुफला कडकडुन मिठी मारली. त्या दिवशी जंगलात चुकामुक झाल्यावर दोघंही एकमेकांना भेटलेच नव्हते. युसुफचं पुढे काय झालं? तो पोलिसांच्या हाती लागला?, का त्यांच्या ...Read Moreमारला गेला?, का तो सुध्दा दिपकसारखा पळुन जाण्यात यशस्वी झाला ह्याची काहीच कल्पना त्याला नव्हती. “कहा था यार तु?”, दिपक युसुफला म्हणाला..“दुनिया छोटी है भाई!! वाटलं नव्हतं परत तुला भेटेन म्हणुन..”, हसत हसत युसुफ म्हणाला.. “खरंच, मलाही वाटलं नव्हतं की इतक्या लवकर तुला भेटु शकेन..”, दिपक म्हणाला..“अरे पण तु इथं कुठे?”, युसुफने मॉटेलकडे हात दाखवत विचारले, तसं दिपकला स्टेफनी, थॉमसची Listen Read पाठलाग – (भाग-१४) (16) 2.2k 1.8k जेंव्हा दीपक आणि स्टेफनी दिल्लीला जायची तयारी करत होते तेंव्हाच युसुफ कोणाशीतरी बोलण्यात मग्न होत. युसुफचा चेहरा घामाने डबडबला होता. त्याच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्ट दिसत होती. नकळत तो हाताच्या बोटांची चाळवाचाळव करत होता. त्याच्या समोर बसलेली व्यक्ती मात्र कमालीची ...Read Moreहोती. डोळ्यावर गॉगल असला तरीही त्या व्यक्तीची रोखलेली नजर युसुफला अस्वस्थ करत होती. “गुड वर्क युसुफ़.. “, बऱ्याच वेळाच्या शांततेनंतर ती व्यक्ती म्हणाली“थॅक्यू जॉनी भाय… “, युसुफ“थोडीपण होशियारी दाखवायची नाय कळला ना? माझा नेम कधीच चुकत नाही, माहितेय तुला~..” जॉनी“नाही भाई, तुम्ही जसे म्हणाल तसेच होईल सगले… “, युसुफ “चल निघ आता, तुझी जरूर पडली कि परत तुला बोल्वेन…”, जॉनी“भाई Listen Read पाठलाग – (भाग-१५) (25) 2.1k 1.9k दोन महीन्यांनंतर – दिपक सकाळी जागा झाला तेंव्हा शेजारी स्टेफनी नव्हती. तो खोलीतुन डोळे चोळत चोळत बाहेर आला. स्वयंपाकघरातुन भांड्यांचा आवाज येत होता तसा तो स्वयंपाकघरात गेला. स्टेफनी त्याला पाठमोरी उभी होती. तो दबक्या पावलांनी तिच्या जवळ गेला आणि ...Read Moreएकदम मिठी मारली. “स्ट्युपीड्ड..”, दचकत स्टेफनी म्हणाली.. तसा दिपक हसायला लागला. व्हाईट शॉर्ट आणि बॉटल-ग्रीन रंगाच्या शर्टमध्ये स्टेफनी अधीकच आकर्षक दिसत होती. फिक्कट नारींगी रंगाच्या रिबीनीने तिने आपली पोनी-टेल बांधली होती. “काय करते आहेस..?”, दिपकने विचारले..“युअर फेव्हरेट..” असं म्हणत स्टेफनीने समोरच्या ताटामधील पिठ घेऊन दिपकच्या गालाला फासले.. “अस्सं..”, दिपक चिडुन म्हणाला आणि तो पिठ घ्यायला ताटलीकडे सरसावला. परंतु आधीच स्टेफनीने Listen Read पाठलाग – (भाग-१६) (17) 2.1k 1.9k बाहेरची आवरा-आवर करून स्टेफनी दिपकच्या खोलीत आली तसा दीपक अचानक तिच्यावर खेकसला, “तू इथे काय करते आहेस? गेट आऊट, तुझ्या खोलीत जाउन झोप” “अरे पण का? काय झालं?”, स्टेफनी“का काय का? तो मोहिते बसला आहे बाहेर. त्याने तुला माझ्या ...Read Moreबघितले तर?” दिपक“पण मी एकटीनेच झोपायचे? आणि मला आज तू हवा असशील तर?” स्टेफनी“थोडे दिवस स्टेफनी…. आत्ता काहीच पर्याय नहिए…. प्लिज…. “, दीपक स्टेफनीने काहीश्या नाराजीनेच खोलीचे दर उघडले आणि अचानक अंधारातून कुठूनतरी येउन समोर मोहिते उभा राहीला. “तुम्ही इथे झोपता का?”, अर्धवट उघडलेल्या खोलीच्या दारातून आत पाहण्याचा प्रयत्न करत मोहिती म्हणाला.“काय बोलता आहात मुर्खासारख?”, काहीसे चिडून स्टेफनी म्हणाली आणि Listen Read पाठलाग – (भाग-१७) (20) 2.1k 1.9k मोहिते निघून गेला, पण जाताना तो जे बोलला ते दोघांच्या डोक्यात घर करून गेले. मोहिते म्हणाला होता, “डोंट ट्राय टू ओव्हरस्मार्ट मी. हे सगळे फोटो आणि माझा पूर्ण रीपोर्ट मी टाईप करून ऑफिसच्या मेल-बॉक्स मध्ये ठेवला आहे. माझ काही ...Read Moreवाईट झाल तर तो रिपोर्ट कुणाकडे द्यायचा ह्याच्या सुचना ही मी देऊन ठेवलेल्या आहेत. सो टेक केअर… ” दुसऱ्या दिवशी सकाळीच मोहिते कुठेतरी निघून गेला होता. स्टेफनी आणि दीपक रूम-मध्ये व्हिस्की घेऊन बसले होते. दोघांनाही काही सुचत नव्हते. “सध्या तरी आपल्याला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नहिए…”, दीपक म्हणाला, “मोहिते जे म्हणतो आहे तेच करावे. निदान ह्या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडू Listen Read पाठलाग – (भाग-१८) (22) 2.1k 1.8k ॥ पर्व दुसरे ॥ दमणमधील ‘वुडलॅंड हॉटेल’ अनेक व्ही.आय.पी आणि व्ही.व्ही.आय.पींनी भरलेले होते. मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर टॅक्सी दिसाव्यात तश्या ऑडी आणि मर्सीडीज पार्कींगमध्ये लागलेल्या होत्या. पोलिसांच्या दोन सेक्युरीटी व्हॅन्स गेटवर अलर्ट होत्याच शिवाय अनेक सेलेब्रेटींचे खाजगी बॉडीगार्ड चेहर्यावर मख्ख ...Read Moreठेवुन उभे होतेच. अर्थात कारणही तसंच होतं. मेहतांची पार्टी म्हणली की ही अशी अनेक बडी थेर आवर्जुन उपस्थीत असायचीच. हॉटेलच्या बाहेर उभारलेल्या शामियान्यात एक पस्तीशीतील तरुणी (!) शैम्पेनचे घोट घेत बरोबरच्या लोकांशी चर्चा करण्यात मग्न होती. इतक्यात एक वेटर तिच्या जवळ येउन अदबीने उभा राहीला. त्या तरुणीने प्रश्नार्थक नजरेने त्या वेटरकडे पाहीले. वेटरने हातातल्या ट्रे मधील फोन त्या तरुणीच्या हातात Listen Read पाठलाग (भाग – १९) (14) 1.9k 1.7k बंगल्याच्याच आवारातील एक १५ x २० ची खोली दिपकला रहायला मिळाली होती. आठवड्याभरामध्येच दिपक ‘माया मॅडम’च्या स्केड्युलशी समरस होऊन गेला. सकाळी ५.३० ते ६.३० ह्या वेळात बंगल्याच्याच क्लबहाऊसमध्ये मेडीटेशन चालु असायचे त्या वेळेत दिपक आंघोळ करुन तयार व्हायचा. ६.४५ ...Read Moreसोलॅरीस क्लबवर टेनीस आणि जिम८ वाजता बंगल्यावर परत.८-९ बंगल्यातील स्विमींग पुलमध्ये स्विमींग१० वाजता ऑफीस सकाळी ऑफीसला निघतानाच बंगल्यातील सेक्रेटरी मायाच्या दिवसभरातील बाहेरील मिटींग्सची प्रिंटआऊट दिपकला देत असे. त्यात वेळ, ठिकाण, मॅप आणि फोन नंबर दिलेला असे. ठरल्यावेळी दिपक ऑफीसच्या गेटपाशी गाडी घेऊन थांबे. संध्याकाळी ८ वाजता बंगल्यावर परत९ वाजता आधीच ठरलेल्या कुठल्याश्या हॉटेल्समध्ये पार्टीज, अन-ऑफीशीअल मिटींग्सरात्री १२ पर्यंत बंगल्यावर परत Listen Read पाठलाग (भाग – २०) (13) 2.1k 1.9k “सो… हे अस आहे सगळ.!!” गाडीच्या बॉनेटवरून उतरत दीपक म्हणाला. माया अजूनही गाडीच्या बॉनेटवरच बसून होती. दिपकने घड्याळात वेळ बघितली. ३.३० वाजून गेले होते. गावातील रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरु झाली होती. दुधाच्या व्हैंस, दैनिक पेपर वाहतूक करणारे टेम्पो रस्त्यावरून ...Read Moreहोते. शहराला हळू हळू जाग येत होती. “आय गेस, वुई शुड लिव्ह नाऊ. साडे तीन वाजून गेले आहेत. उद्या ऑफिसला काही महत्वाच्या मिटींग्स आहेत न?” “लिव्ह द मिटींग्स.. “, माया थंड स्वरात म्हणाली मायाच्या त्या अनपेक्षित उत्तराने दीपक चमकला आणि त्याने मागे वळून पहिले. माया एकदा त्याच्याकडे बघून हसली आणि उजव्या हाताने तिने आपला काळ्या रंगाचा पार्टी गाऊन वरती घ्यायला Listen Read पाठलाग (भाग – २१) (17) 2k 1.9k “माझा प्लॅन रेडी आहे..”, दोन दिवसांनी सकाळी ऑफीसला जाताना माया दिपकला म्हणाली. “दुपारची कॉन्फरंन्स मी गार्डन-कोर्ट ला हलवली आहे, ऑफीसपासुन दुर आहे, जायला निदान तासभरतरी लागेल, तेंव्हा डिटेल मध्ये बोलु. बाहेर कुठे भेटुन बोलण्यापेक्षा गाडीतच बोललेले बरं..” दिपकने मान ...Read Moreसंमती दर्शवली. ठरल्यावेळी माया ऑफीसमधुन निघाली. बरोबर ऑफीसमधील दोन-तिन डायरेक्टर्स होते, पण ते नशीबाने दुसर्या गाडीत बसले.दिपकने गाडी सुरु केली. सुरुवातीचे काही फोन कॉल्स झाल्यावर माया म्हणाली, “आपल्या मित्राचं नाव इन्स्पेक्टर शेखावत आहे. तुम्ही लोकं जेल मधुन पळुन गेल्यानंतर, त्या जेल मधुन त्याची आता बदली झाली आहे. परंतु त्याचा राग अजुनही धुमसतो आहे. तुम्हाला पकडुन त्याला त्याची गेलेली इज्जत परत Listen Read पाठलाग (भाग – २२) (15) 2k 1.8k दीपक बारमध्ये पोहोचला तेंव्हा बार गर्दीने भरून गेला होता. हवश्या-नवश्यांपासून ते पट्टीचे पिणार्यांपर्यंत झाडून सर्वजण हजर होते. बारच्या एका कोपऱ्यात जुगारांचा डाव रंगला होता. पूर्ण बार सिगारेटच्या धुराने भरून गेला होता. दीपकची नजर शेखावतचा शोध घेत होती. त्याला शोधायला ...Read Moreफार वेळ लागला नाही. बारच्या काउंटरला लागून असलेल्या एका स्टुलावर तो आपला देह विसाउन बसला होता. हातामध्ये एक बिअरचा मोठ्ठा ग्लास होता. डोळ्यावर गॉगल होता, पण त्याची शोधक नजर बारमधून सर्वत्र फिरत होती. बारच्या दारात उभ्या असलेल्या दीपक वर काही क्षण त्याची नजर स्थिरावली. दोघांची नजरा-नजर झाली आणि मग परत तो इतरत्र बघु लागला. अर्थातच त्याने दीपकला ह्या वेशात ओळखले Listen Read पाठलाग (भाग – २३) (15) 1.8k 1.6k दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर बघितल्यावर दिपकला पहिला धक्का बसला. आदल्या रात्री ज्याचा खून झाला होता तो शेखावत साधा सुधा इन्स्पेक्टर नव्हता तर तो होता डी.सी.पी.शेखावत – डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस. मधल्या काळात त्याचे प्रमोशन झाले होते. साधा सुधा कोणी ...Read Moreअसता तर कदाचित इतकी हवा झाली नसती, पण मुंबई सारख्या शहराचा डीसीपी आणि त्याच्या आपल्या इथे झालेला खून, त्यामुळेच ही बातमी मिडीयाने उचलून धरली होती. आणि दीपकच्या दृष्टीने मजेशीर गोष्ट म्हणजे अख्या बातमीत कुठेही एका दाढीवाल्या दारुड्याचा आणि शेखावतशी झालेल्या त्याच्या हातापाईचा उल्लेख नव्हता. उलटपक्षी त्याला झालेल्या मारहाणी वरून आणि नंतर गोळी झाडून झालेल्या म्रुत्युवरुन हा एखादा नियोजीत कट होता Listen Read पाठलाग (भाग-२४) (17) 2k 1.9k डिसुझा जेंव्हा दमणला यायला निघाला तेंव्हा अनेकांनी त्याला अंडरकव्हर रहायला सांगीतले होते. अनेक जण त्याला म्हणाले होते की तेथील स्टेट पोलिस तपास करत असताना सि.आय.डी. ऑफीसर तपास करायला आला म्हणल्यावर खरे गुन्हेगार सतर्क होतील. कदाचीत त्याच्या जिवाला सुध्दा धोका ...Read Moreपहातील. पण डिसुझाला खरं तर तेच हवं होतं. गुन्हेगारांनी सतर्क व्हावं, त्याच्या हालचालींवर नजर ठेवावी किंवा त्याच्या हल्ला करण्याची सुध्दा हिंमत करावी. कारण तसं केलं तरच गुन्हेगार समोर येऊ शकतील.. अती सावधानतेच्या प्रयत्नात ते एखादी चुक करुन बसतील हे डिसुझा पुर्ण ओळखुन होता आणि म्हणुनच जेंव्हा दमणला तो हॉटेलमध्ये चेक-ईन करत होता तेंव्हा त्याने तेथील रजिस्टरमध्ये आपल्या नावाच्या प्रोफ़ेशनमध्ये सि.आय.डी Listen Read पाठलाग (भाग-२५) (17) 1.9k 1.5k “राणा एक काम करा, आपल्या कंप्युटर ग्राफिक्स डिझायनरला दीपकचा फोटो स्कॅन करून पाठवा. त्याला म्हणाव ह्याचा सर्व तऱ्हेने बदलाव करून त्याचे फोटो करून पाठवा. म्हणजे खूप दाढी वाढवलेला, खूप केस वाढवलेला, पूर्ण टक्कल केलेला, मिश्या आणि लांब केस असलेला… ...Read Moreनक्कीच आपल्या चेहऱ्यात दिसण्यात बदल केले असतील त्यामुळे त्याला लगेच ओळखण कठीण जाईल. म्हणून शक्य तितके वेगळे लुक्सचे फोटो करून पाठवायला सांग. दीपक कुमार नक्कीच दमण मध्येच आहे आणि त्याने शेखावतला कट करून बोलावून घेतले ह्यामागे त्याची नक्कीच काहीतरी योजना असणार, नाहीतर तोच मुंबईला नसता का गेला. “, डिसुझा बोलत होता. राणाने मान डोलावून सहमती दर्शवली“येस सर, लगेच कामाला लागतो”, Listen Read पाठलाग (भाग-२६) (21) 1.9k 1.5k “अर्रे व्वा! खुद्द दिपक कुमार हजर झालेत…”, डिसुझा हसत हसत म्हणाला.. “हे तर म्हणजे असं झालं अंधा मांगे एक, भगवान दे दो!, काय राणा??” “येस्स सर.. खरं आहे…”, राणा हसण्यात सामील झाला “बसा.. दिपक कुमार.. बसा.. खुप पळापळ झाली ...Read Moreदमला असाल बसा..”, समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत डिसुझा म्हणाला.. दिपककडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. तो शांतपणे खुर्चीत जाऊन बसला. “राणा, बेड्या घाला त्यांना आधी.. काय आहे ना, फौजी तालीम आहे.. आपल्याला उगाच कॅज्युलिटीज नकोत..”, डिसुझा राणाने दिपकचे दोन्ही हात खुर्चीच्या मागे ओढले आणि त्याला बेड्या ठोकल्या. “राणा.. तुझ्या माणसांना बाहेर थांबायला सांग.. आपल्याला जरा महत्वाचं बोलायचं आहे..”, डिसुझा राणाने बाकीच्या Listen Read पाठलाग (भाग-२७) (17) 1.9k 1.5k डिसुझाने शेखावतची फाईल पुर्ण वाचुन संपवली. दोन क्षण तो डोळे मिटुन बसला. थोड्या वेळात इन्स्पेक्टर राणा आतमध्ये आला. “सर, दिपकचा काहीच पत्ता नाही. अचानक कुठे गायब झाला अजुन तरी काहीच थांगपत्ता लागत नाहीये. आपली माणसं मागावर आहेत. बघु, सापडेलच ...Read Moreना कुठे तरी”, राणा “राणा….”, डिसुझा थोड्यावेळ विचार करुन म्हणाला “येस्स सर…”, राणा “ही शेखावतची फाईल वाचली मी. विचार करण्यासारखी एक गोष्ट मला जाणवली.. शेखावत इथे.. दमणमध्ये पोस्टींगला होता?” “नो आयडीया सर, मला तर ही न्युज आहे..”, राणा “हम्म, दहा वर्षांपुर्वी.. तेंव्हा तो एक हवालदार होता. कदाचीत त्यामुळे ही गोष्ट प्रकाशझोतात नाही आली नसेल..”, डिसुझा “ओह.. दॅट एक्स्प्लेंन्स हिज दमण Listen Read पाठलाग (भाग-२८)-शेवटचा (85) 1.8k 1.6k ज्यावेळी डिसुझा त्याचा पुर्ण फौज फ़ाटा घेऊन मायाच्या बंगल्याकडे निघाला होता त्यावेळी माया आपलं प्लॅनींग दिपकला सांगण्यात मग्न होती. ” थॉमसला जॉनीनेच मारले हे आत्तापर्यंत तु ओळखलं असशीलच. त्यानुसार प्रथम थॉमसला मारुन त्याने तुम्हाला कोंडीत पकडले. तुमची होणारी तडफड, ...Read Moreत्याला सुखावत होती. स्टेफनीने मुर्खपणा किंबहुना हावरपणा करुन थॉमसचा इन्शोरन्स क्लेम फ़ाईल केला. इतक्या मोठ्या रकमेसाठी पुर्ण पडताळणी होतेच आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा एजंट एन्क्वायरीसाठी पाठवुन दिला. आज नाही तर उद्या तपासात थॉमसचा मृत्यु हा बनाव होता हे लक्षात आले असते आणि पोलिस तुझ्यापर्यंत पोहोचले असते. त्यामुळे जॉनीने इन्शोरन्स एजंटला संपवुन माफीयाच्याच एका माणसाला मोहीते बनवुन तुमच्या घरात घुसवले. शक्य Listen Read More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Novel Episodes Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Humour stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Social Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Aniket Samudra Follow