पाठलाग – (भाग-१८)

(24)
  • 7.7k
  • 2
  • 4.1k

॥ पर्व दुसरे ॥ दमणमधील ‘वुडलॅंड हॉटेल’ अनेक व्ही.आय.पी आणि व्ही.व्ही.आय.पींनी भरलेले होते. मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर टॅक्सी दिसाव्यात तश्या ऑडी आणि मर्सीडीज पार्कींगमध्ये लागलेल्या होत्या. पोलिसांच्या दोन सेक्युरीटी व्हॅन्स गेटवर अलर्ट होत्याच शिवाय अनेक सेलेब्रेटींचे खाजगी बॉडीगार्ड चेहर्‍यावर मख्ख भाव ठेवुन उभे होतेच. अर्थात कारणही तसंच होतं. मेहतांची पार्टी म्हणली की ही अशी अनेक बडी थेर आवर्जुन उपस्थीत असायचीच. हॉटेलच्या बाहेर उभारलेल्या शामियान्यात एक पस्तीशीतील तरुणी (!) शैम्पेनचे घोट घेत बरोबरच्या लोकांशी चर्चा करण्यात मग्न होती. इतक्यात एक वेटर तिच्या जवळ येउन अदबीने उभा राहीला. त्या तरुणीने प्रश्नार्थक नजरेने त्या वेटरकडे पाहीले. वेटरने हातातल्या ट्रे मधील फोन त्या तरुणीच्या हातात