पाठलाग (भाग-२४)

(19)
  • 7.6k
  • 3.6k

डिसुझा जेंव्हा दमणला यायला निघाला तेंव्हा अनेकांनी त्याला अंडरकव्हर रहायला सांगीतले होते. अनेक जण त्याला म्हणाले होते की तेथील स्टेट पोलिस तपास करत असताना सि.आय.डी. ऑफीसर तपास करायला आला म्हणल्यावर खरे गुन्हेगार सतर्क होतील. कदाचीत त्याच्या जिवाला सुध्दा धोका पोहोचवु पहातील. पण डिसुझाला खरं तर तेच हवं होतं. गुन्हेगारांनी सतर्क व्हावं, त्याच्या हालचालींवर नजर ठेवावी किंवा त्याच्या हल्ला करण्याची सुध्दा हिंमत करावी. कारण तसं केलं तरच गुन्हेगार समोर येऊ शकतील.. अती सावधानतेच्या प्रयत्नात ते एखादी चुक करुन बसतील हे डिसुझा पुर्ण ओळखुन होता आणि म्हणुनच जेंव्हा दमणला तो हॉटेलमध्ये चेक-ईन करत होता तेंव्हा त्याने तेथील रजिस्टरमध्ये आपल्या नावाच्या प्रोफ़ेशनमध्ये सि.आय.डी