माझे आवडते कथाकार -- द.मा.मिरासदार !

  • 13.6k
  • 2.5k

कथा वाचनाचा भवसागर पार करणाऱ्यांना ग्रामीण कथा वाचल्या वाचून किनारा सापडत नाही. ग्रामीण पार्श्वभूमीवर अनेक कथाकारांनी आपल्या लेखण्या आजमावल्या आहेत आणि आजही आजमावत आहेत. तसा मी अल्पमती वाचक आहे. फार जुने ग्रामीण साहित्य माझ्या वाचनात नाही. व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील आणि द. मा.मिरासदार यांच्या काही कथा वाचण्यात आल्यात. हे तिघेही ' स्वतंत्र संस्थाने ' आहेत. प्रत्येकाची शैली,लेखनाचा पोत, आणि ग्रामीण जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोण भिन्न आहेत. या तिघांनी मिळून केलेले कथाकथनाचे प्रयोग, कथा रसिक विसरणे शक्य नाही. माडगुलकरांचे लेखन अत्यंत साधे, सोपे, सुपाच्य म्हणावे असे बाळबोध स्वरूपाचे आहे. वहिवाटेच्या रस्त्यात माणूस जसा, रात्री अंधरात सुद्धा न ठेचाळता चालतो, तसे त्यांचे