बायको आणि मैत्रीण !

  • 13.2k
  • 3.1k

दोन घट्ट वेण्या घालून सोबत शाळेत येणारी शेजारची 'निमी ', अचानक एके दिवशी सुंदर पौनी टेल करून येते. 'ये तुम्ही पोर पोर, तिकडं पलीकडं खेळा' म्हणणारी, हल्ली स्वतःच दूर जाऊन खेळते. फडतूस विनोदाला घोड्या सारखं खिंकाळून हसणारी, मंद गालातल्या गालात हसते. काल पर्यंत, 'ये मला सायकल शिकव ना ' म्हणणारी,, 'चल निमे आपण सायकल खेळू, मी, शिकवतो तुला', म्हणलं तरी ' नको आई रागावते अन मला काम पण आहे.' म्हणून येण्याचे टाळते. शाळा सुटल्यावर, गरगर दप्तर फिरवून पाठीवर घेत धूम घरा कडे पळणारी 'निमा', आता मात्र छातीशी वह्या पुस्तकांचा गठ्ठा धरून, ह्ळुहुळू डौलदार पावले टाकत चालते. काहीतरी तिच्यात बदलेले