हंबीरराव,बहिर्जी आणि बहादूरखान

  • 7.2k
  • 2.7k

नुकताच राज्याभिषेक सोहळा पडला होता...सहयाद्री आणि रायगड आनंदाच्या वर्षावात न्हाहून गेले...स्वराज्य अवतरले होते...रायगड आता सर्व सहयाद्री आणि किल्ल्याच्या राजा झाला होता...साधू-संत...लहान-थोर...बाया-बापड्या...सर्व संतुष्ट झाले होते...सर्व आसमंतात राजांचे आणि रायगडाचे नाव दुमदुमत होते...आता कोणाचीही वाकडी नजर होणार नव्हती स्वराज्याकडे...राजे निश्चिन्त आणि संतुष्ट मनाने..लिंगाणा, राजगड, तोरणा; मकरंदगड, प्रतापगड, वासोटा आणि सभोवताली पसरलेल्या स्वराज्याची पाहणी करत होते...हवेत गारवा पसरला होता...राजांनी अंगाभोवती लपेटलेली शाल अजूनच लपेटून घेतली...आणि टकमक टोकावरून जगदीश्वर मंदिराच्या दिशेने चालू लागले... जगदीश्वराच्या मंदिरात प्रसन्न शांतता पसरली होती...आता लावलेल्या कापूर आणि धुपाचा वास वातावरणात भरून राहिला होता...आत गाभाऱ्यात पुजारी मंत्रो-उच्चार करत होते...आवाज आतल्या