AGENT - X (11)

  • 5k
  • 2.3k

११. फायनल वर्डीक्ड् -मिस्टर वाघनं मिथिलची ती 'मॉसबर्ग एमसी वन एससी' ही सबकॉपॅक्ट सेमी ऑटोमॅटिक नाईन एमएम पिस्टल माझ्यासमोर ठेवली. पण आज माझं त्या गनकडं लक्ष नव्हतं."सबकॉपॅक्ट सेमी ऑटोमॅटिक नाईन एमएम कॅलिबर! कपॅसिटी फ्लश-फिट मॅगझीनमध्ये सहा राऊंड व एक्सटेंडेड् मॅगझीनमध्ये सात राऊंड. लांबी सहा पॉईंट पंचवीस इंच. वजन सहाशे तेवीस पॉईंट सात ग्रॅम. फुल्ली लोडेड् अँड इसी टू रेग्युलर कॅरी. खूप कम्फर्टेबल आहे! " तो म्हणाला.मी भयंकर धक्क्यात होतो. तो काय बोलतोय हे त्यावेळी माझ्या कानात गेलं फक्त पण डोक्यात शिरलं नाही... मी विचार होतो, की मिस्टर वाघची प्रत्येक केस अधिकाधिक खतरनाक होत चालली आहे आणि मी त्याचा इच्छा नसताना एक