अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (6)

  • 5.6k
  • 1
  • 2.3k

६. समथिंग सिरीयस -"या घटना घडायला कधीपासून सुरुवात झाली?" मिस्टर वाघनं अनुषाला विचारलं."एक महिना झाला." ती उत्तरली."बी स्पेसिफिक!" मिस्टर वाघ जरा चिडूनच म्हणाला.एक डिटेक्टव्ह असून तिनं असं उथळ उत्तर देणं त्याला आवडलं नव्हतं."बारा फरवरीला पहिली घटना घडली होती.""कुल!" तो पुन्हा नॉर्मल झाला.मिस्टर वाघ बाहेर पडला. अनुषाला त्याला फॉलो करण्याशिवाय पर्याय नव्हता. तीनेही त्याच्या मागून घर सोडले.मिस्टर वाघ आणि अनुषा दोघे नैनिताल पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या 'पंतनगर एअरपोर्ट'ला आले. पासपोर्ट ऑफिसरला भेटून आपली खरी ओळख सांगत त्यानं त्या फॉरेनर मुलीबद्दल चौकशी केली, "गुड अफ्टरनून ऑफिसर, मैं विजय वाघ. एक प्रायव्हेट इन्वेस्टीगेटर हूँ। शहर में हो रहे सुसाईड केसेस् को मैं हँडल