A Strange Thing - The Siren Calls - 6 books and stories free download online pdf in Marathi

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (6)

६. समथिंग सिरीयस -

"या घटना घडायला कधीपासून सुरुवात झाली?" मिस्टर वाघनं अनुषाला विचारलं.
"एक महिना झाला." ती उत्तरली.
"बी स्पेसिफिक!" मिस्टर वाघ जरा चिडूनच म्हणाला.
एक डिटेक्टव्ह असून तिनं असं उथळ उत्तर देणं त्याला आवडलं नव्हतं.
"बारा फरवरीला पहिली घटना घडली होती."
"कुल!" तो पुन्हा नॉर्मल झाला.
मिस्टर वाघ बाहेर पडला. अनुषाला त्याला फॉलो करण्याशिवाय पर्याय नव्हता. तीनेही त्याच्या मागून घर सोडले.

मिस्टर वाघ आणि अनुषा दोघे नैनिताल पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या 'पंतनगर एअरपोर्ट'ला आले. पासपोर्ट ऑफिसरला भेटून आपली खरी ओळख सांगत त्यानं त्या फॉरेनर मुलीबद्दल चौकशी केली,
"गुड अफ्टरनून ऑफिसर, मैं विजय वाघ. एक प्रायव्हेट इन्वेस्टीगेटर हूँ। शहर में हो रहे सुसाईड केसेस् को मैं हँडल कर रहा हूँ. क्या मुझे थोडी इन्फॉर्मेशन मिल सकती हैं?" मिस्टर वाघनं पासपोर्ट ऑफिसरला विचारलं.
"नहीं सर! मैं ऐसे आपको कोई इन्फॉर्मेशन नहीं दे सकता. अगर आपको चाहीये तो आपको पहले पुलीस की इजाजत लेनी पडेगी!" ऑफीसरने मिस्टर वाघचा प्रस्ताव नाकारण्याची हिंमत केली.
"ठीक हैं! मैं डिरेक्टली होम मिनिस्टर से ही बात करता हूँ. साथ मैं सिव्हील एव्हीएशन मिनिस्टर से भी बात कर लेता हूँ!" मिस्टर वाघनं खिशातून मोबाईल काढला.
ऑफिसर काय समजायचं ते समजला.
"नहीं सर; प्लिज. आपको जो चाहीये वह इन्फॉर्मेशन आपको मिल जायेगी. आप तकलिफ मत लिजीए..." तो मिस्टर वाघला म्हणाला.
"ठीक हैं! मुझे दो महिने पहले से स्वीडन से आई औरतों की लिस्ट चाहीये। जिनकी उम्र बीस से पच्चीस के बीच हो!"
ऑफिसरने काही वेळ त्याच्या कंप्युटरवर सर्च केलं. आणि म्हणाला,
'पिछले जनवरी उन्नतीस तारीख को सिर्फ एकही स्वीडिश लड़की नैनिताल आई हैं! उस का नाम एलिस निल्सन हैं और उसकी उम्र भी चोबीस साल ही हैं!" पासपोर्ट ऑफिसरनं माहिती पुरवली.
"नाईस! क्या हमें उसकी फोटो मिल सकती हैं! अब यह मत कहीयेगा, की पुलीस को पुछना पडेगा!" त्यानं सवयी प्रमाणं खट्याळ स्मित करत ऑफीसरला पण पिन मारलीच.
ऑफिसर मिस्टर वाघचं ऐकून घेऊन गप्प बसला आणि त्याला त्या मुलीच्या फोटोची प्रिंट काढून मिस्टर वाघला दिली.
"थँक्स ऑफिसर!" मिस्टर वाघनं स्माईल करत त्याच्याशी हस्तांदोलन केलं आणि एअरपोर्ट मधून बाहेर गाडी जवळ आला. अनुषा अजूनही काही न समजल्यासारखी गोंधळलेलीच होती.
"यू वेअर ब्लफिंग. राईट?" तिनं त्याला विचारलं.
"अबाऊट व्हॉट?" तिला काय म्हणायचंय माहीत असून त्यानं न समजल्यासारखं तिला विचारलं.
"आबाऊट कॉलिंग होम अँड एव्हीएशन मिनिस्टर्स..." ती अजूनही गोंधळात होती...
"तुला खरंच असं वाटतंय, की मी चेष्टा करत होतो?" त्यानं मोबाईल मधील मिनिस्टर्सचे नंबर्स अनुषाला दाखवले.
याचा तिला अक्षरशः धक्का बसला. हे पाहून तो हसला,
"उगाच मी म्हणत नाही, की मी फेमस आहे म्हणून. चला, बसा गाडीत."
हे तिला बोलून त्यानं आपल्या नव्या घेतलेल्या 1935 ची डेलेहॅ 135 मेगासीमेन्स (1935 Delahaye 135MS) या कारच्या स्टेअरिंगचा ताबा घेतला सुद्धा होता. नुकतीच नैनिताल मध्येच ही विंटेज कार त्यानं विकत घेतली होती.
अनुषाही लगेच गाडीत त्याच्या शेजारी बसली. आणि मिस्टर वाघ अनुषाच्या घरी परतला. रात्री पर्यंत आता त्याला काही काम नसल्यानं तो अनुषा सोबत नैनितालच्या निसर्गाचा आस्वाद घेण्यात दंग झाला.

अनुषा आणि मिस्टर वाघ 'नैनी' या तलावापाशी उभे होते. मिस्टर वाघ तलावाच्या शांत पाण्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर देखील कमालीची शांतता होती.
"आमचे स्थानिक लोक मानतात, की ब्रह्मदेवांच्या कठोर तपस्चर्येमुळं हा तलाव तयार झाला आहे. इथं जवळच ब्रम्हाचं मंदिर पण आहे." अनुषानं शांतता भंग केली.
पण मिस्टर वाघ त्याच्यातील शांततेपासून ढळला नाही.
"आय डोन्ट बिलिव्ह इन गॉड!" एवढंच उत्तर त्यानं अनुषाला दिलं.
त्यांचं सगळं लक्ष शांत अशा पाण्याकडं लागलं होतं.
"व्हाय?" अनुषानं त्याला प्रश्न केला.
त्यानं तिच्याकडं मान वळवली. म्हणाला,
"बिकॉस माय क्रिएटर डज्नन्ट!" त्यानं स्मित करत तिला उत्तर दिलं.
"मिन्स यू बिलिव्ह इन द क्रिएटर!" तिनं विचारलं.
मिस्टर वाघ दोन्ही बाजूनं बोलतोय हे ऐकून तिचा गोंधळ उडत होता.
"येस!" त्यानं क्षणाचा विलंब न लावता उत्तर दिलं.
"देन हू इज युअर क्रिएटर?" तिनं पुन्हा प्रश्न केला.
"माय माईंड!" त्यानं पुढं पाहत उत्तर दिलं,
"वी ऑल क्रिएटेड बाय आव्हर ओन इमॅजिनेशन्स अँड बिलिफ्स! आणि जेव्हा तुम्हाला हे समजेल, तेव्हा लक्षात येईल, की घाबरण्यासारखे तर काहीच नाही!"
संध्याकाळची छाया निसर्गाला आणि पर्यायानं अनुषा व मिस्टर वाघला कवेत घेण्यासाठी सरसावत होती. समोर मावळणारा सूर्य मनोहर दिसत होता.
अनुषाच्या चेहऱ्यावर सूर्याचं पडलेलं लखलखीत तेज दिसत होतं. सुर्याचं तेज मावळत कमी कमी होत होतं. पण तिचा चेहरा त्या तेजाचा मोहताज नव्हता. आता मिस्टर वाघच्या उत्तराने तिला जे ज्ञान मिळालं होतं त्याचं ते तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं.
मिस्टर वाघचं उत्तर अनुषाला पटल्याच दिसत होतं.
पुढं ती म्हणाली,
"इथं आणखी एक आख्यायिका आहे; असं म्हटलं जातं, की एका परिक्रमेत जर या तलावाच्या नऊ कोपऱ्यांचे जर कोणी दर्शन घेवू शकलं, तर त्याला ब्रम्हप्राप्ती होते. त्याला निर्वाण प्राप्त होतं! मला हे ऐकल्यापासून निर्वाण प्राप्त करण्याची इच्छा आहे, पण मी अजून तसा प्रयत्न केला नाही." आता ती मिस्टर वाघ इतक्याच शांतपणे बोलत होती.
तिनं मिस्टर वाघकडं नजर फिरवली,
"पण मला वाटतं, की तुम्हाला ब्रम्हही मिळालाय आणि निर्वाणही!"
तिच्या या वाक्यावर मिस्टर वाघ तिच्याकडं न पाहताच नुसताच हसला...