तू माझा सांगाती...! - 2

  • 6.4k
  • 1
  • 2.3k

विक्टर; सर्वांच्या दृष्टीकोनातून जनार्दन सारंग यांचा मेड रोबोट! त्यामुळे तो कोणाला इजा करणे शक्य नाही, पण तरी त्याने आपल्याच एम्प्लॉयरला जीवे मारले होते! का...? कोणालाच माहीत नाही! प्राथमिक चौकशीत विक्टरने काहीच सांगण्यास नकार दिला होता. आणि कायदाने त्याला तसा अधिकार दिल्याने कोणी त्याला सत्य सांगण्यास बाध्य करू शकत नव्हतं आणि म्हणून त्याला सरळ कोर्टासमोर उभा करण्यात आलं होतं... पोलिसांनी त्यांच्याकडील फुटेजच्या आधारे ही केस उभी करण्याचा प्रयत्न केला होता. पण तसेही काही होताना दिसत नव्हते!इथेही कायदा आडवा येतच होता. विक्टरची मेमरी व्हिज्युअल रुपात पाहिली, तर सत्य समोर येणार होते. पण सरळ होतं, की विक्टर तशी परवानगी देणार नव्हता!विक्टर... हे नांव जनार्दन