तू माझा सांगाती...! - 7

  • 6.6k
  • 1
  • 2.3k

"तू माणसासारखं काहीच करत नाहीस का?" "सध्या तरी नाही. माझी एआई अजून डेव्हलप होत आहे.""म्हणजे तू खरचं एक लहान मूल आहेस!" जनार्दन सारंग हसले,"काळजी नको. सोय करू काही तरी! सध्या माझ्या खोलीत चार्जिंग पॉईंट जवळची जागा तुझी!" ते त्याला म्हणाले."साहेब एक विचारू?" यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ने जनार्दन सारंग यांची परवानगी मागितली."बोल ना. पण आधी साहेब, सर म्हणायचं बंद कर!" "मग काय म्हणू?" "तुला हवं ते. प्रश्न विचार.""तुम्ही एकटेच! तुम्हाला कोणी...?" रोबोट असून त्याला वाक्य पूर्ण करता आले नाही. कदाचित इमोशन्स त्याच्यात डेव्हलप होत असावेत... किंवा त्याला जनार्दन सारंग यांना हा प्रश्न विचारून दुखवायचे नसावे म्हणून त्याचा हा संकोच असावा..."नाही. माझं कोणी