प्यार मे.. कधी कधी (भाग-१२)

(13)
  • 10.9k
  • 1
  • 6.2k

घड्याळात १०.३०च वाजले होते. दुसर्‍या दिवशी न्यु-जॉईनीजना काही प्रेझेंटेशन्स द्यायची होती. पण त्याच्यावर फायनल टच द्यायचा राह्यला होता. आधी विचार केला होता की बॅंगलोरला येताना फ्लाईटमध्ये करुन टाकीन, पण त्यावेळेस ‘इतर’ महत्वाची कामं असल्याने ते राहुनच गेलं होतं. चरफडत लॅपटॉप चालु केला आणि ‘लव्ह’, ‘विरह’, ‘फिलींग्स’ वगैरे गोष्टी बाजुला सारुन ‘क्लाऊड कंप्युटींग’, ‘डेटा-अ‍ॅनॅलिटीक्स’, ‘सॉफ्टवेअर-अ‍ॅज-अ-सर्व्हिस’ वगैरे किचकट गोष्टींमध्ये बुडुन गेलो. कसा बसा अर्धा तासच झाला असेल इतक्यात मोबाईलवर मेसेजचा दिवा लुकलुकला.. प्रितीचा मेसेज होता.. “अजुन जागाच आहेस?”“हम्म..”“का रे? झोप येत नाहीये का? मला तर येतच नाहीये झोप”” ” “बरं मग काय ठरलं आपलं?”“कश्याचं?”“अरे असं काय? मगाशी काय झोपेत बोललास का माझ्याशी?