प्यार मे.. कधी कधी (भाग-१५)

(17)
  • 10.3k
  • 3
  • 5.4k

परीक्षेच्या दोन दिवस आधी प्रितीचा मेसेज आला की नेहाने तिचं नावं कॉलेजमधुन काढून घेतलं आहे.. बहुतेक ती पुढे शिकणारच नाहीये.. मी तो मेसेज दोनदा वाचला आणि डिलीट करुन टाकला. मनामध्ये एक आशा होती की नेहाशी संबंधीत ही शेवटचीच गोष्ट.. कदाचीत.. ह्यापुढे नेहा किंवा तिच्याशी संबंधीत कुठलीच गोष्ट माझ्या.. ‘आमच्या’ आयुष्यात येणार नाही… कदाचीत.. प्रितीची परीक्षा संपण्याची तारीख मी दिवस मोजुन मोजुन जवळ आणत होतो. तिचं परीक्षेचे पुर्ण टाईम-टेबल मला पाठ होते. कुठल्या दिवशी, किती वाजता, कोणता पेपर आहे सगळं. ह्या काळात मी प्रितीला कधी फोन केला नाही, की मेसेज.. मग प्रत्यक्ष भेटण्याचा तर प्रश्नच नव्हता. साधं ‘बेस्ट-लक’ सुध्दा म्हणालो नव्हतो.