सूड ... (भाग ७)

  • 13.6k
  • 1
  • 9.4k

महेश आणि अभिषेक दोघेही अजून विचारात गुंतून गेले. शांतच बसले होते दोघेही. तितक्यात कोमलच्या मोबाईलच लोकेशन मिळालं. " अभिषेक सर, जरा मुश्कीलनेच भेटलं, त्या मोबाईलच लोकेशन… मोबाईल बंद आहे बहुदा. शेवटचा तो शनिवारी use झाला होता. त्यानंतर स्विच ऑफ…. ", त्याने माहिती पुरवली. " शनिवारी… किती वाजता ? आणि लोकेशन काय आहे…. ?", "शनिवारी रात्री… साधारण ११.१५ ते ११.३० च्या दरम्यान… त्यानंतर स्विच ऑफ…. आणि लोकेशन आहे, Goa airport… ", आता तर अभी वेडाच होणार होता. " तू नक्की याचं मोबाईलचं लोकेशन काढलंसं ना… बघ जरा. सोलापूरच्या आसपास असेल लोकेशन." , "नाही सर. तो मोबाईल शेवटी Goa airport लाच होता…