सूड ... (भाग १३)

(13)
  • 13.8k
  • 2
  • 9k

शांतता… चार जणाविरुद्ध arrest warrant होतं. ते सगळे मान खाली घालून उभे होते. अभि सगळ्याकडे पाहत होता. काजल रडत होती. महेश अजूनही अभिकडे पाहत होता. " कसं ना…. सगळेच गुंतले आहेत crime मध्ये…. एखाद्या movie सारखं झालं… मी आता हल्लीच एक movie बघितला होता मी. त्यातसुद्धा असंच दाखवलं होतं, सर्व लोकांना एकत्र बोलावून सगळ्यासमोर आरोपीला आणायचे. मला असंच करायचे होते एकदा. तरी एवढया लवकर संधी येईल अस वाटलं नव्हतं मला.… मस्त एकदम. " अभि स्वतःच हसत होता. बराच वेळ महेश, अभिकडे पाहत होता. त्याने न राहवून अभिला विचारलं, " अरे पण, आपली main केस राहिली ना… कोमल कूठे आहे… ",