चांदणी रात्र - ७

  • 7.2k
  • 2k

राजेश नेहमीच्या वेळेला संदीपच्या घरापाशी पोहोचला. संदीपने नेहमीप्रमाणे कालच्या होमवर्कबददल विचारलं. ‘या संदीपला आभ्यास सोडून इतर गोष्टीसुद्धा असतात हे माहीतच नाही. नेहमी हा आभ्यास, होमवर्क एवढंच बोलतो. त्यामुळेच याचे आपण सोडलं तर फारसे मित्र नाहीत.’ राजेशच्या मनात विचार आला. एक दिवस संदीपला माणसात आणायचा त्याने मनोमन संकल्प केला. राजेश आणि संदीप कॉलेजात पोहोचले. ते मेनगेट मधून आत आले. कॉलेजचे शिपाई गण्याकाका नोटिसबोर्डवर नोटिस लावत होते. “कसली नोटिस आहे काका?” राजेशने त्यांना विचारलं. त्यावर ते नेहमीच्या खोचकपणे म्हणाले, “मला काय ईचारतो, बोर्डावर लिव्हलय ते वाच.” राजेशने गण्याकाकांकडे दुर्लक्ष केलं व तो नोटिस वाचू लागला. नेहमीप्रमाणे कॉलेजने यावर्षी सुद्धा मुलामुलींसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित