मित्र my friend - भाग ११

  • 7.2k
  • 2.6k

" काय वेडं -बीड लागलं आहे का तुला... काय करत होतीस... भूत शिरलं आहे का अंगात.. " विवेक वैतागला होता. " अरे सोडून दे रे ती कंपनी.. एवढं काम करतोस... सुट्टी देऊ शकत नाही तुला.. काय करायची असली कंपनी... " , " सोडून दे काय... आता गेलो तरी उभं करणार नाही बॉस... ऐकलंस ना काय बोलला... कायमची सुट्टी घे... तुझ्यामुळे.. थँक्स... " विवेकने हात जोडले आणि बसची वाट बघू लागला. बस स्टॉप वर दोघेच.. जाऊ का ऑफिसमध्ये.. बॉसला सॉरी बोलू ... नाहीतर नको.. डोकं गरम असेल अजून... इतक्यात बस आली. दोघांना जागा भेटली. प्रियाला तशी झोपच आली होती. गाडीत बसल्या