अपूर्ण बदला ( भाग ९ )

  • 8.9k
  • 3.7k

गुरुजीना पोहचायला अजून वेळ लागणार होता, दुसऱ्या गावात असल्यामुळे त्यांना चांगलाच वेळ लागणार होता, त्यांनी भल्या भल्या भूताना आपल्या बॉक्स( लहान पेटी) मध्ये भरून त्यांना नाहीसे केले होते. त्यांची चांगलीच महती होती. बारा गावाच्या भूतांना पाणी पाजलं होत. रव्याची अवस्था बिकट होत होती तो जोर जोरात ओरडत होता. हरीला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे काय होतंय त्याच्या मित्राबरोबर? त्याला रडू आवरेनासे झालेलं. आपल्या भावासारख्या मित्राची अशी अवस्था कुणाला बघवेल .आणि तो जोरजोरात हुंदके देऊन रडू लागला हरीला असं रडताना पाहून हरीची आई जरा जास्तच काळजीत दिसत होती .तिला चांगलाच माहिती होत रव्या हरीला सख्या भावासारखा होता. म्हणून ती त्याला