चांदणी रात्र - १३

  • 7.1k
  • 1.7k

सकाळी उठून नाष्टा करून शेतात जायचं. दिवसभर शेतात काम करायचं. बरोबर आणलेल्या डब्यातलं दुपारी जेवायचं. संध्याकाळी नदीवर जाऊन सूर्याचं दर्शन घ्यायचं व घरी परतायचं असा राजेशचा रोजचा दिनक्रम ठरला होता. रोज वृषालीला एकदा तरी फोन व्हायचा. पण काहीवेळा फोन लागायचा नाही. मग वृषालीशी बोलणं नाही झालं तर राजेशला खूप उदास वाटायचं. पाहतापाहता निकालाचा दिवस उजाडला. राजेश संदीपला फोन लावणार होता तितक्यात वृषालीचा फोन आला. “अभिनंदन” राजेश काही बोलायच्या आतच वृषाली म्हणाली. “तू वर्गात तिसरा आलास.” राजेशला हे अपेक्षितच होतं, त्यामुळे त्याला काही वेगळं वाटलं नाही. “थँक्स. तुझं काय झालं. झालीस का मॅथस मध्ये पास.?” राजेशने विचारलं. “हो झाले एकदाची. मी काही