वैरण - III

(11)
  • 10k
  • 2.3k

वैरण भाग-III  तानाजीचे मन गाव सोडायला तयार नव्हते.पण करणार काय, बघितलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण धुळीस मिळाल्या होत्या.शिवाय कमावणारे हात गमावले होते.बाबा गेल्यानंतर दोन दिवस शेजारच्या लोकांनी जेवण पुरवलं.त्यानंतर स्वत:च्या घराची काळजी सत:च करावी लागते. आईच्या काळजीखातर नाईलाजाने तो गाव सोडायला तयार झाला. वैरण भाग-II पासून पुढे..., तानाजीच्या आईने गावकडे आलेले संघर्षमय अनुभव सांगितल्यानंतर ती पुढे बोलायला लागली, "तानाजी आणि मी पुण्यात आलो.आबाकाकांच्या मित्राने राहण्याची सोय केली पण पंधरा दिवस कामाचा पत्ता नव्हता.शिवाय इथे आमच्या ओळखीचं कोणी नव्हतं आणि त्यात........." "त्यात माझी आणि तानाजीची भेट झाली.त्याला बघितल्यावर मला जाणवले की त्याला कामाची नितांत गरज आहे.मग मी माझ्या ओळखीने त्याला काम मिळवून