ठाकर पाडा

  • 4.1k
  • 1
  • 1.5k

ठाकर पाडा अवघ ३०० -३५० लोकसंख्येचा पाडा . मुख्य रस्त्या पासून ५ ते ६ मैल दूर तौल्याचा डोंगरात वसलेली शांत वस्ती . पाड्याकडं जाण्यासाठी पक्की सडक नव्हती वहिवाटीनी पडलेली आडवळणी वाट एवढाच पाड्यावर जाण्यासाठीचा मार्ग , ठाकरांला गाव गाठायचा म्हणजे ५- ६ मैलांची पायपीट करायला लागे .मग तिथून मुख्य हमरस्त्यावर एखाद वडाप मिळतं का ते बघावं लागे .गावापासून दूर असला तरी पाडा संपन्न होता. कधीच कोणाला घाईवर येऊन गाव गाठायची वेळ आली नव्हती. पाड्याचा मध्यभागीच ग्रामदेवतेच कौलारू देऊळ बांधलेलं ,सगळे त्याला तौल्या बाबाच म्हणत.कुणाचं दुखलं-खुपलं कि तौल्या ला कौल लावला जायचा, तेवढ्यावरच लोकांचं समाधान होई. कधी शहरात