कॉलगर्ल - भाग 9

(31)
  • 26.9k
  • 2
  • 15.2k

सकाळी यश उठला. नेहमीप्रमाणे त्यानं किचनमध्ये पाहिलं. पण जान्हवी तेथे नव्हती, कुठे गेली असेल सकाळी सकाळी? बहुतेक गोगटे काकूंकडे गेली असेल म्हणून यश बाहेर आला. समोरचे दृश्य पाहून त्याला हसू आवरलं नाही. साडी नेसलेली जान्हवी, तुळशीसमोर पूजेचं ताट घेऊन उभी होती. तिने तुळशी वृन्दावनातील वाळलेली पाने बाजूला केली. तुळशीला स्नान घातले, तिला हळद कुंकू वाहिले. समोर उदबत्ती लावली. दिवा ओवाळला. पाच प्रदक्षिणा घालून मनोभावे नमस्कार केला. यश दारातच उभा होता. तो अजूनही हसतच होता. “यश, का हासतोयेस?” “हे आत्ता तुझं काय चाललं होतं?” “काय म्हणजे? तुळशीला पाणी घालत होते.” “का?” “गोगटे काकू म्हणतात, तुळस सासुरवाशीणीची पाठराखीण असते. ती तिच्यावर कायम