विश्वासाची विसंगती

  • 7.7k
  • 1.4k

'विश्वासाची विसंगती'आईने मटर पनीर बनवायचा बेत ठरवला, अन् मला पनीर आणायला बेकरीत पाठवले, बेकरी घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे, जाताना मोबाईल हातात घेऊन प्रतिलीपीवर पाटलांची प्राजु यांची 'विश्वास' ही सत्यकथा वाचत हळूहळू चालत जात होतो.कुणावर विश्वास ठेवावा की नाही. वाचून मन सुन्न झालं. मी बेकरीत पोहोचलो,पण निशब्द होऊन थोडा वेळ तसाच उभा राहिलो.बेकरीचे मालक 'आण्णा' मला चांगले ओळखतात.त्यांनी मला दंडाला हलवून विचारले,"कुठे हरवलास.काय देऊ?" "२५० ग्रॅम पनीर दया", असे म्हणून मी पाकिटातून दहाच्या सात नोटा असे सत्तर रुपये काढून दिले. त्यांनी त्या नोटा माझ्यासमोर एकदा मोजून घेतल्या, पुन्हा एकदा नोटा मोजल्या.आणि ड्राॅवरमध्ये ठेवल्या. विश्र्वास ही कथा वाचून मन अगोदरच हळवे