नेताजींचे सहवासात - 2

  • 6k
  • 2.1k

नेताजींचे सहवासात प्रेषक, शशिकांत ओक, Fri, 06/12/2013 - 00:33 भाग 2 प्रस्तावना -... पु.ना. ओकांच्या पुस्तकाचा मुकुटमणी आहे त्या प्रकरण 10- बाबत ते प्रस्तावनेत प्रखरपणे उल्लेख करतात की ‘इसापनीती, पंचतंत्र अथवा हितोपदेश इत्यादि ग्रंथ जसे काऊ-चिऊच्या गोष्टी सांगण्याच्या उद्देशाने लिहिलेले नाहीत तद्वत प्रस्तूत ग्रंथही केवळ मनोरंजनासाठी लिहिलेला नाही. त्याच प्रमाणे "सुभाष लीलामृत" अथवा “सुभाष महात्म्य" या दृष्टीने प्रस्तूत ग्रंथाकडे पाहणे चुकीचे ठरेल……लेखक व वाचकांचा स्वातंत्र्यपुर्व काळातील आपल्या समाजातील घटनांचा अन्योन्य संबंध कसा आहे, यावर ते म्हणतात, 'वाचकांच्या आवडीनिवडी भिन्न असतात. सर्वांचे समाधान करू पाहणाऱ्या लेखकाची स्थिती इसापनीतील गोष्टीप्रमाणे गाढव विकावयास नेणाऱ्या म्हाताऱ्यासारखी व्हायची! गिऱ्हाईकांच्या चटावलेल्या जिभेस भजी, भेऴ, उसळ, मिसळ,