नेताजींचे सहवासात - 3

  • 7.4k
  • 1
  • 2.1k

नेताजींचे सहवासात प्रेषक, शशिकांत ओक, Fri, 06/12/2013 - 00:33 नेताजींचे सहवासात नेताजींचे सहवासात पुस्तक परिचय - भाग ३(अ) मित्रांनो,आज नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आहे. त्या निमित्ताने या पुस्तकाचा परिचय भाग 3 सादर करीत आहे.आज तिथीनुसार स्वामी विवेकानंदांची जयंतीही साजरी होत आहे. (दिनांकानुसार दि 12 जानेवारी) भाग 3 (अ) - नेताजी निवास सिंगापूर बेटाच्या पुर्व किनाऱ्यावर समुद्रकाठी एकएका धनिकांचे ऐसपैस बंगले आहेत. त्या विभागास ‘कातोंग’ म्हणतात. स्थानिक लोकांच्या धनाने, श्रमाने बांधलेल्या या इमारतीत पाश्चात्यांची चैनबाजी चालत असे. अतिपुर्व युद्धाची वावटळ सुरू होऊन इंग्रजांचे राज्यछत्र उडू लागल्या बरोबर ऐषआराम करणारे युरोपियन, अमेरिकन, ज्यू, अरब, चिनी इत्यादि अठरापगड जातींचे लोक दाही दिशांना पांगले,