एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 11

  • 4.5k
  • 2k

मुंबईहून परतल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी अजिंक्य ऑफिसला जॉइन झाला ..बॉसने मिटिंग घेऊन पून्हा एक नवीन साईट मिळाल्याची बातमी दिली ..आनंदाची बातमी एकूण सर्व खुश होते फक्त अजिंक्यला आनंद झाला नव्हता ..नवीन प्रोजेक्ट म्हणजे पुन्हा जास्त मेहनत आणि जास्त वेळ द्यावा लागणार होता त्यामुळे तो थोडा नाराज झाला ..सराणी ह्याही प्रोजेक्टच काम अजिंक्यकडे सोपवल होत ..आणि विशेष म्हणजे हे प्रोजेक्ट हेद्राबादला पूर्ण करायचं होतं ..त्यामुळे प्रत्येक आठवडयाला दोन दिवस तरी तिथे जाऊन राहावं लागणार होतं आणि म्हणूनच अजिंक्य थोडा नाराज झाला .. मुंबईहून परतल्यावर अजिंक्य आपल्या कामात फारच व्यस्त झाला होता ..सकाळी उठून लवकर ऑफिसला जाणे आणि सायंकाळी उशिरा परतणे