लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ५)

(15)
  • 8.7k
  • 3.7k

म्हणायला रोशनीच्या महालात माणसांचा राबता होता परंतु रोशनीवर माया करणारे कोणीच नव्हते. आपल्या लाडक्या मालकीणीच्या मृत्युस ही सावळी, लंगडी महामायाच कारणीभुत आहे अश्या काहीश्या बुरसटलेल्या विचारांनी नोकरवर्गाने सुध्दा तिच्यावर आपला जिव ओवाळुन टाकला नाही. मेहतांसमोर सर्वजण रोशनीच्या मागे-पुढे करत. परंतु त्यांच्या मागे मात्र रोशनी त्यांच्या लेखी अस्तीत्वातच नव्हती. रोशनी मोठी होत गेली आणि तिचे जग संकुचीत गेले. आपल्या बेढब रुपाला बुजुन ती बाहेर पडेनाशी झाली. तिचा स्वभाव एकलकोंडा होत गेला. मेहता आपल्याच कामात मग्न होते. त्यांच्याकडे रोशनीसाठीच काय, स्वतःसाठीसुध्दा वेळ नव्हता. लहानपणापासुनच प्रेमाला पारखी झालेली रोशनी मनोमन प्रेम काय आहे हे माहीत नसतानाही खर्‍याप्रेमासाठी तरसत राहीली. परीकथांमध्ये असलेला राजकुमार एकदिवशी