भातुकलीतले प्रेम - 3

  • 3.8k
  • 1.2k

पाच दिवसांनंतर सूर्या घरी आला. मुसळधार पाऊस चालू होता. घरी आल्यानंतर अंघोळ करून फ्रेश होऊन आल्यावर आई समोरच उभी होती. " पावसातून आला तरी अंघोळ केली होय " " सकाळी अंघोळ केली नवती, म्हणून म्हणल फ्रेश व्हावे" " बर जाऊदे, काही खाणार आहेस का ?" " नाही नको , मी थोड खाल्ल होत रेस्टॉरंट ला, आणि मला लगेच निघायचं आहे, थोड थकलेलं असल्यामुळे आज ऑफिस मध्ये आणि क्लास ला जाणार नाही, मग वेळ आहे तर येतो मामांकडे जाऊन "