शोध चंद्रशेखरचा! - 19

(16)
  • 5.9k
  • 2.4k

शोध चंद्रशेखरचा! १९ --- संधी प्रकाशात पीटरचे ते गोडाऊन भूत बंगल्या सारखे दिसत होते. मुख्य रस्त्याच्या खोल आतल्या बाजूला ते होते. दोन किलोमीटरवर समुद्रकिनारा होता. गोडाऊन पर्यंत कच्चा रास्ता होता. त्या कच्या रस्त्यावरून, एक छोटा जुना तरी दणकट टेट्रा ट्रक तोल सांभाळत गोडाऊनच्या मागच्या बाजूला भिंतीला खेटून उभा राहिला. त्यातून दोन काळ्या सावल्या उतरल्या आणि आपल्या कामाला लागल्या! त्यांनतर साधारण अर्ध्या तासाने, एक मारुती झेनच जून डबडं पीटरचा झोपड्या जवळ थांबलं. त्यातून आधी सिगारेटचं पेटत टोक आणि त्यामागे सुलेमान बाहेर आला. दुसऱ्या बाजूने बक्षी उतरला. तेरा ये सिग्रेट बुझा! सौ किलोमीटरसे जलता सिग्रेट लॉकेट होता! काम के वखत मत पिया