प्रपोज - 3

(15)
  • 11.7k
  • 2
  • 6.5k

काय झालं असेल तीला...? हा विचार करतच सर्व तिथून बाहेर पडलो.. **** सकाळी उठायला जरा उशीरच झाला , कदाचीत काल रात्री बराच वेळ त्या मुलीचा, म्हणजे तीच्या अवस्थेचा विचार करत होतो, त्यामुळे लवकर झोप लागली नव्हती.. हातांवर, गालावर ,मानेवर नख्यांनी ओरबडलेल्या जखमा , पिंजलेले केस, आणी अचानक तीच किंचाळण. रात्रभर तेच दृष्य डोळ्यांसमोर येत होत... अंघोळ वगैरे आटोपुन नेहमीप्रमाणे कामावर जायला निघालो... बाईक वरून बाहेर पडलो आणि काही अंतरावर गेलो होतो तस लक्षात आल की मोबाइल घरीच राहीला आहे... बाईक वळवण्यासाठी मी मागे पाहिल तशी 'ती' येताना दिसली.. तीचे