शेतकरी माझा भोळा - 10

  • 5.9k
  • 2
  • 2k

१०) शेतकरी माझा भोळा! संपाचा पाचवा दिस उजडला. पर संप मिटायची काय बी चिन्न दिसत न्हवते. कामगार पाच म्हैन्याचा पगार देईस्तोर आन लेबर लोक आर्धी ऊचल फायजेत म्हणून हटून बसले व्हते. डिरेक्टर मंडळ दोन पगार म्हैन्याचा पगार आन् पच्चीस टक्के ऊचल देयाया राजी झालं पर तोडगा निघत न्हवता. कामगारायचा आन् लेबरायचा नेता लै भारी व्हता. भासण करताना त्यो फाडफाड बोलत व्हता. डिरेक्टर मंडळानं कसा भ्रस्टाचार केला त्येची यादी सामानावाणी तोंड पाठ वरडू वरडू सांगत व्हता.