शेतकरी माझा भोळा - 14

  • 4.8k
  • 1.8k

१४) शेतकरी माझा भोळा! दुम्हार लावलेल्या सर्कीनं मातर गणपतवर किरपा केली. सर्की आशी मास्त निघाली की बास! गणपत आन् यस्वदा ज्याम खुस झाले. दुसऱ्यायच्या मांघून लावलेली आसून बी सरकी सम्द्याच्यापेक्सा जोरानं वाढत व्हती.. एकूणीस-ईसचा फरक व्हता. लोकायनं कापसालं खत देयाला सुरुवात केली."यस्वदे, आग सम्दे कापसाला खत देयालेत.""खरं की? मंग आपूनबी देवू की.""पैका कोठून आणावं?""अव्हो, सोसायटीकडं फा की आसल तं आसल.""सोसायटी मंदी खताचा दाणाबी न्हाई. कालच चेअरमनला ईच्यारलं. तालुक्याच्या हापीसातल्या हामालायचा संप चालू हाय म्हण.""या लोकायलाबी ह्योच टैम मिळाला न्हव संप कराया.