जुना घाट

(46)
  • 13.3k
  • 3
  • 3.7k

नुकताच पावसाळा सुरू झाला.राजेश आणि त्याच्या मित्रांनी कोकणात फिरायला जायचं असा प्लान केला.रविवारी दुपारी निघू असं सांगून राजेशने बॅग पॅक करायला सुरुवात केली.त्यात एकीकडून राजेशच्या आईच्या सुचना सुरू झाल्या. "राजेश नीट जा हा बाळा आणि कोकणात पाऊसही खूप असतो त्यामुळे गाडी सांभाळून चालव आणि मी असं एैकलय की कोकणात भुताटकी ही फार असते."यावर राजेश हसून म्हणाला..., काय भुताटकी , अगं आई असं काही नसतं या सगळ्या अंधश्रद्धा आहेत बाकी काही नाही. आणि तु काळजी नको करू मी जाईन नीट ओके.तेवढ्यात राजेशचे मित्र त्याला घराखालून आवाज देऊ लागले."राजेश..ऽऽ राजेश...ऽऽ झालं का...?राजेशने ही आवाज देऊन सांगितले...हो..ऽ हो...ऽ आलोच. "चल येतो