हे बंध रेशमाचे (भाग 1)

(20)
  • 7.6k
  • 3
  • 2.3k

नुकतेच लग्न झालेली कविता तिच्या संसारात रुळण्याचा प्रयत्न करत होती. लग्नाचे नवीन नवीन दिवस कसे आनंदाचे आणि उत्साहीपुर्ण असतात. कविताचं ग्र्याज्युएशन पूर्ण झालं होतं आणि ती एका प्रायव्हेट कंपनीत जॉबला होती. लग्नासाठी तिने एक मागिन्याची सुट्टी घेतली होती. लग्न होऊन आता 10 दिवस झाले होते. अजून 10 दिवसाची सुट्टी शिल्लक होती. कविता आणि विनोदचं तसं अरेंज म्यारेज झालं होतं. त्यामुळं कविता आणि विनोदला एक मेकांचा स्वभाव अजून पूर्णपणे माहित नव्हता. लग्नानंतर मस्त हनिमूनला जायचं असा विचार करूनच कविताने 1 महिन्याची सुट्टी घेतली होती. पण इकडे परिस्तिथी काही वेगळीच होती. लग्नाच्या 3 सऱ्या दिवसापासूनच विनोद पुन्हा जॉबला जात होता.