शापित कलाकार

  • 6.1k
  • 1.7k

त्या दुपारी मेघा जराशी घाईतच दिसत होती. सकाळचा नवऱ्याचा डबा, दुपारचे जेवण, कपडे-भांडी, घर आवरणं सगळं झालं होतं. तरीही नवऱ्याने फोनवर 'संध्याकाळी कामातले मित्र घरी जेवणासाठी येणार आहेत' असे सांगितल्यापासून मेघाला काय करू आणि काय नको असे झाले होते. मेघा तशी एक उत्तम गृहिणी होती. घर टापटीप ठेवण्याची तिची आवड लहानपणापासूनची होती. इतकेच काय तिची रंगांबाबतची निवडदेखील उत्कृष्ट अशी होती. घरातील भिंतींचा रंग, पडद्यांचे रंग त्यावरची नक्षी अतिशय बारकाईने विचार करून तिने निवडले होते, कपाटात कुठली वस्तू कुठे असावी, कशी असावी, कोणत्या दिशेच्या भिंतीवर कोणते चित्र लावायचे, फेंगशुईच्या वस्तूंचा घर सजवण्यासाठी कसा वापर करावा या कला तर एखाद्या वास्तुविशारदाप्रमाणे तिला