लक्ष्मी - 4

  • 19.2k
  • 12.2k

कादंबरी लक्ष्मी भाग - चौथा मोहनचे लग्न मोहनचे काम अगदी सुरळीत चालू होते. रोज सकाळी शहरात जाणे व सायंकाळी परत येणे. आईच्या हाताने तयार केलेला डबा सोबत असायचे. त्याला बाहेरचे खाण्याची अजिबात सवय नव्हती. साधी चहा पिण्याची सुद्धा लकब नव्हती बाकीच्या गोष्टी तर कोसो दूर होत्या. दुपारच्या वेळी दुकानातच आपला डबा खायचा आणि काम करायचं. त्याचे काम पाहून व्यापारी खूपच आनंदात होता. त्याला मोहनच्या स्वरूपात एक प्रामाणिक, मेहनती आणि कष्टाळू प्रधानजी लाभला होता. मोहनचे पाय दुकानाला लागल्यापासून त्याच्या व्यापारात देखील वृद्धी झाली होती. मोहनच्या भरवश्यावर तो व्यापारी दुसऱ्या गावात जाऊन आपला व्यवहार करू लागला. मोहनच्या मनात कधीही लालच किंवा लोभ