लक्ष्मी - 6

  • 11.4k
  • 6.7k

भाग - सहावा लक्ष्मीचे शिक्षण पहिली बेटी तूप रोटी असे पूर्वीचे लोकं म्हणत असत. लक्ष्मीचे चालणे, बोलणे आणि तिची प्रत्येक हालचाल सर्वांना आनंद देऊन जात होती. लक्ष्मी मोठी होऊ लागली तसे तिचे बुद्धीचातुर्य लक्षात येऊ लागले होते. आपल्या बापाप्रमाणे ती खूपच बुद्धिमान होती. कोणतीही गोष्ट एकदा सांगितली की ती लक्षात ठेवायची. योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरू लागली. मोहनवर जसे त्याच्या वडिलांचे संस्कार होते तसे लक्ष्मीवर तिच्या बाबाचे म्हणजे मोहनचे संस्कार होते. दिवसभर ती मायजवळ राहायची. माईने तिला अनेक गाणी , गोष्टी सांगायची. लक्ष्मीची आई कामात राहायची त्यामुळे ती जास्त तिच्याकडे जात नव्हती. सायंकाळी मोहन घरी आला की, लक्ष्मी त्याच्याकडे जायची.