आकस्मित

  • 4k
  • 1.3k

कॉलेजचे आवार आज अगदी फुलुन गेलं होतं. नुकतीच १०वी पास होऊन कॉलेज लाईफ सुरु करणार होती ही मुलं. नोटीस बोर्ड पाशी गर्दी करून जो तो आपला वर्ग कोणत्या मजल्यावर आहे हें शोधत होते. कोणाचे आई-वडील सोडायला आले होते, कोणी खुप कॉन्फिडेंट होतें तर कोणी अगदीच बावरून गेले होतें. एक वेगळाच उत्साह होता या मुलांच्यात. डोळ्यात एक वेगळीच चमक होती. बेल वाजली!!! आणि सर्वजण आपापल्या वर्गात जाऊन बसले. ११वी सायन्स A चा वर्ग; अभ्यंकर सर, फिजिक्स हा विषय शिकवायचे. सगळ्यांनी "गूड मॉर्निंग सर" असें म्हणताच " Please take your seats" हे बोलण्याची त्यांची विशिष्ट लकब फेमस होती; त्यानी लगेच हजेरी घ्यायला सुरुवात