विनयभंग......

  • 10.4k
  • 3.3k

शैला: "स्त्रियांना एक संधी मिळाली की, त्या स्वतःस सिद्ध करण्यात स्वतःला झोकून देतात...इतकेच काय तर, स्व अस्तित्व जपून त्या हे सगळं करत असतात.....आज स्त्री सशक्तीकरण या मुद्द्यावर अनेक नेते आवर्जून लक्ष देताना आपण बघतो.....स्त्रियांना योग्य त्या सुखसोई पुरवून देण्यात ते सक्षम आहेत...." आज ०८ मार्च "आंतरराष्ट्रीय महिला दिवस" यानिमित्ताने शैला विद्यापीठात वक्तृत्व स्पर्धेसाठी एक स्पर्धक म्हणून स्वतःचे मत इतरांना पटवून देण्याची तयारी करत होती....इतक्यात तिचे लक्ष घड्याळाकडे गेले आणि ती थबकली...? कारण, चक्क सकाळचे ०९:०० वाजले होते आणि शैलाला १०:०० च्या आत प्रवेश नोंदणी करून सभागृहात बसायचे होते.... शैला: "अरे बापरे!! ०९:०० वाजलेत....हे देवा आता बस मला लवकर वेळेत पोहचव