कादंबरी -प्रेमाची जादू - भाग -१२ वा

  • 9.3k
  • 3.3k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग -१२ वा ----------------------------------------------------------------------------- मधुरा अंजलीवहिनींना म्हणाली - वहिनी -मला एक मोठी प्लेट द्याना प्लीज , आत येण्या अगोदर माळीकाकांशी बोलताना मी त्यांच्याकडून ही अबोलीची फुले आणलीत पहा , आता या फुलांचे छानसे गजरे करते .. संध्याकाळी माळूया केसावरती आपण सगळ्याजणी, आजींना ,आईना आवडेल आणि वाहिनी खूप छान दिसेल तुमच्या केसावरती गजरा . मधुराने समोर बसलेल्या मोनिकाकडे पाहत विचारले .. मोनिका मैडम- तुमच्यासाठी करू ना गजरा ? त्यावर झुरळ झटकून टाकावे ..तसे मधुराचे शब्द झटकून टाकल्यासारखे करीत मोनिका म्हणाली .. छे छे ..हे असले काही आवडत नाही आणि चालत पण नाही मला .. यु नो मधुरा