प्रेमाचं मूल्यमापन ....

  • 3.9k
  • 1.2k

आज लवकर येशील?? त्याच्या मोबाईल वर मेसेज आला... आता हे काय नवीन?? परवाच तर सुट्टी झाली ना यार..anniversary म्हणून. परत आज लवकर येशील म्हणून मेसेज...कठीण आहे बाबा....काय बोलू आता ही राधा पण ना...जरा समजून घेत नाही यार ..!!!! बघतो...कठीण वाटते...प्रयत्न करतो .....काही काम आहे का??? हम्म्म काम नाही पण appraisal आहे..!!!घरी ये बोलू... राधा ने मेसेज केला हे काय नवीन खूळ आत्ता...appraisal कसले......झाले की डिसेंबर मध्ये ..आत्ता कुठे..ह्या राधाचे ना काही कळत नाही अशीच आहे पहिल्या पासून ..नीट काही बोलेल तर शपथ... त्याचे मन भूतकाळात रमले. कामचा समोर ढीग पडला होता पण सगळे यांत्रिकपणे चालू होते...मन मात्र