ती कोजागृती पौर्णिमा (भाग-चार)

  • 9.4k
  • 3.7k

पानांची सळसळ होत असते. सगळीकडे दाट अंधार पसरलेला असतो. आणि अचानक वारा सुटू लागतो. इकडे सौरभचा गृप कब्रस्तानातील पौर्णिमाची कब्र खोदत असतात. तेवढ्यात बाजूच्याच कब्रितुन एक हात बाहेर येतो. ते सगळे अजुन घाबरतात आणि एक फूट मागे सरकतात तेवढ्यात त्यांना आपल्या मागे कुणीतरी असल्याची चाहुल लागते. आणि ते परत मागे वळतात. आता मात्र मिनलला ही खुप भीती वाटत असते. ती सगळ्यांना उद्देशुन बोलते. "यार मला वाटतंय आपण इथे नको होतं यायला. ह्या रेवतीच आपण ऐकल आणि आपला जीव धोक्यात घातला आहे. यार तु का सगळ्यांना इथं आणलस? मला वाटतंय इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे आपण इथुन निघायला हवं सोडा ते सगळं."