वृद्धाश्रमातलं प्रेम - 3

  • 6.2k
  • 2.3k

भाग – ३ सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी मॅनेजर आवर्जून उपस्थित होते. निवार्‍यात कुणी नवीन आलं की त्यांची ओळख करून द्यायला म्हणून ते सायंकाळी प्रार्थनेला हजर असत. प्रार्थनेची वेळ होत आली तशी सर्वांची पावले मंदिराकडे वळू लागली. या लोकांसाठी प्रार्थना म्हणजे मनाला समजूत घालण्याची एक तर्‍हा होती. प्रार्थना सुरू झाली. नेहमीच्या सवयीप्रमाणे सर्वजण एकामागून एक श्लोक म्हणत होते. या श्लोकांचा अर्थ मात्र सर्वांना माहिती नसावा बहुतेक. पण मनाला तेवढाच एक आधार म्हणून ते म्हणायचे. प्रार्थनेची मात्र एक गंमत असते, प्रार्थना केली की सर्वांना वाटतं आपलं काम संपलं आता चेंडू देवाच्या कोर्टात. पण तसं नसतं हो. असो, उगाच तत्वज्ञान वगैरे. प्रार्थना झाली. सर्वजण