वृद्धाश्रमातलं प्रेम - 7

  • 5.5k
  • 2.5k

भाग – ७ “तुमची जागा रिझर्व्ह करून ठेवली होती.” माझ्या या वाक्यानंतर ती जास्तच हसू लागली. मग आम्ही अभ्यासाला सुरुवात केली. त्या दिवशी तिने माला भरपूर अडचणी विचारल्या. माला शक्य तेवढ्या सोडवल्या. त्या दिवशी माझा बर्‍यापैकी अभ्यास झाला आणि तिचा भरपूर. मी खोलीवर येईपर्यंत, आल्यावर, झोपताना आणि झोपेतसुद्धा माझ्या मनात सुधाचेच विचार सुरू होते. तो रुमाल मी सांभाळून पेटीत ठेऊन दिला. असाच अभ्यास होत राहिला. परीक्षा झाली. दोघं उत्तम गुणांनी पास झालो. रिझल्ट लागला तेव्हा ती खूप आनंदात माझ्याकडे आली आणि म्हणाली, “अभिनंदन.” मीसुद्धा तिला तेवढ्याच आनंदात म्हणालो, “तुमचंसुद्धा.” “तुमचीच कृपा. तुम्ही लायब्ररीत मदत केली नसती तर काही खरं नव्हतं