वृद्धाश्रमातलं प्रेम - 9

  • 4.6k
  • 2k

भाग – ९ त्या दिवशी जेवणानंतर सर्वांनी मिळून महाजन काकांना समजावलं, “बघ, इतक्या वर्षानी तुझं प्रेम तुला परत मिळालंय. म्हणजे तुझ्या समोर आलंय. तुझं आपलं आणि हक्काचं असं कुणी राहिलेलं नाही. त्यांनासुद्धा कुणी नाही असं दिसतंय नाहीतर त्या वृद्धाश्रमात आल्या नसत्या. तू स्वतःहून बोल त्यांच्याशी. त्यांना चांगलं वाटेल. त्या इथं नवीन आहेत. मन रामायला वेळ लागेल. कर विचार.” महाजन काकांनी विचार केला, मंडळी सांगत होती ते देखील खरंच होतं म्हणा. दोघांच्या आयुष्यात एकाकीपणा अगदी अमावास्येच्या काळ्याकुट्ट अंधारासारखा भरला होता. इतक्या वर्षांनी पहिलं प्रेम समोर येणं हे केवळ योगायोगाने झालं नव्हतं, ती नियतीची एक ठरवलेली गोष्ट होती. आयुष्याच्या शेवटी का असेना