२९ जून २०६१ - काळरात्र - 4

  • 8.9k
  • 3.3k

“तुला ही माहिती कुठून मिळाली?” हंसीकाने अनिला विचारलं. “माझ्या भावाने सांगितलं. तो केंब्रिज मधल्या ‘एमआयटी’ मध्ये क्वांटम फिजिक्सचा प्रोफेसर आहे.” अनिने सांगितलं. आता सर्वांच्या नजरा अनिनकडे वळल्या होत्या. टेबलवर ठेवलेला वाईनचा ग्लास हातात घेत अनि म्हणाला, “काहीही अकल्पित किंवा विचित्र घडल्यास त्याने मला कॉन्टॅक्ट करायला लावला आहे आणि सर्वांसाठी एक महत्वाची बातमी त्याने सांगितलं आहे, जी हंसीकाने आपल्याला सांगितली नाही, की या वेळी जो धूमकेतू पृथ्वीवरून पास होणार आहे, त्याचा केंद्रबिंदू हा पुणे आणि आजूबाजूचा परिसर आहे. एम आय राइट हंसीका?” “येस, ऑफकोर्स. मला तुमचा मूड खराब नव्हता करायचा. म्हणून मी काही बोलले नाही.” हंसीका मान डोलवत