गोट्या - भाग 9 - माझ्या गुरुजीची दस्ती

  • 6.2k
  • 1.6k

माझ्या गुरुजीची दस्ती शाळेच्या सहलीत गुरुजींचा रुमाल पाण्यात पडतो तेव्हा एक विद्यार्थी ते रुमाल आणून सरांना देतो. गुरू-शिष्याची अनोखी लघुकथा शाळेच्या मैदानात सारी मुले गोळा झाली होती. शाळेला नियमितपणे न येणाऱ्या मुलांचे चेहरे देखील आज दिसत होते. साऱ्यांच्या चेहऱ्यावर खुशीची एक लहर दिसत होती. पाचव्या वर्गातील राम, विकास, उत्तम, शीला, सीमा हे विद्यार्थी सर्व मुलांना एका झाडाखाली बसवून पवार सरांच्या येण्याची वाट पाहत होते. आज निमित्त होते निसर्ग सहलीचे. रामपूर हे गाव सीता नदीच्या काठावर वसलेले दीड हजार लोकसंख्या असलेले गाव. त्या गावातील जिल्हा परिषदेची पाचवी पर्यंतची शाळा आणि त्या शाळेत पवार सर हे एकटेच शिक्षक त्या 35 मुलांना शिकवण्याचे