कामिनी

  • 18k
  • 5.8k

कामिनीBy Sanjay Kamble रात्र बरीच झाली होती. मार्केट मधून जवळजवळ आवश्यक त्या सर्व साहित्याची खरेदी करून झालेली... त्या आलिशान दुकानातून बाहेर पडताच लख्ख चमकलेल्या वीजे सरशी त्याची नजर वर आकाशात गेली आणि तो काहीसा अस्वस्थ झाला... काळ्याकुट्ट ढगांनी आकाशात गर्दी करायला सुरुवात केलेली.......दिवसभर वाहनांनी गजबजलेल्या या रस्त्यावर आता वाहनांची तुरळक ये-जा सुरू होती... एकंदरीत सारं वातावरण पाहून तो ही झपाझप पावलं टाकत जरा वेगातच बस स्टॉप च्या दिशेने चालू लागला. चालताना मात्र त्याच्या मनात नको नको ते विचार येत होते... ' आज आपल्याला उशीर झाला..! आणि आजच आपल्याला उशीर झाला.. पण आजच आपल्याला उशीर का झाला..?