कादंबरी - प्रेमाची जादू - अंतिम भाग - ३६ वा

(18)
  • 8.9k
  • 1
  • 3.2k

कादंबरी – प्रेमाची जादू अंतिम भाग – भाग-३६ वा ------------------------------------------------------------------------------------ गेल्या रविवारी यशने माळीकाकंना बोलवून घेत म्हटले – तुम्ही लगेच नारयणकाकांच्या घरी जा आणि त्यांना सोबतच इथे घेऊन या, त्यांच्याशी मला आज जग्गुच्या संदर्भात बोलायचे आहे –सांगायचे आहे आणि विचारयचे सुद्धा आहे. हे ऐकून माळीकाका म्हणाले- हे बाकी बेस्ट सुचलाय बघा तुम्हाला . कारण आपल्या ऑफिस मध्ये –ग्यारेज मध्ये सगळ्यांच्यासमोर नारायणकाकांची झाडाझडती घेणे “ बरोबर दिसले नसते ..त्यांचा अपमान केल्यासारखे झाले असते . त्यापेक्षा ..इथं बोलवून तुम्ही पार फैलावर घेऊन विचारले तरी ..कुणाला काही समजायचे नाही . आणि नारायानकाकांना पण कळले पाहिजे की- त्याच्या जावयाचे प्रताप लोकांनी येऊन तुमच्यासमोर सांगितले